Sunday, March 30, 2008

"फ़ोरसीझन्स वाईनरी" चे बारामतीमध्ये थाटात उद्‍घाटन !

बारामतीमध्ये जगातील दुस‍-या क्रमांकाची व भारतातील पहिल्या क्रमांकाची वाईनरी उभी राहात आहे. गुरुवार दि. २७ मार्च रोजी या वाईनरीचे उद्‍घाटन झाले. हा वाईनरी प्रकल्प बारामती जवळील दौंड तालुक्यातील रोटी येथे २५० ते ३०० एकरात राबविला जाईल. या वाईनरीची स्वत:ची टेस्टींग लॅब असेल. तसेच येथे स्वीमिंग पूल, गोल्फ़ मैदान असेल. मनोरंजनाचे वातावरण निर्माण व्हावे म्हणून महालासारखी इमारत उभी राहत आहे. हि "फ़ोरसीझन्स वाईनरी" मद्यसम्राट श्री. विजय मल्ल्या यांच्या मालकीची असली तरी मा. श्री. शरद पवारांसह बारामतीच्या दौंड भागातील शेतक-यांचेही ४९ टक्के भांडवल या "वईनरीत" आहे.

Tuesday, January 29, 2008

वाईन म्हणजे काय ?

जसे दुधापासून दही तयार करताना आपण त्यात विरजण टाकल्यावर आंबवण्याची (Fermentation) क्रिया चालू होऊन त्याचे दही बनते अगदी तसेच वाईन द्राक्षाच्या रसामध्ये विशिष्ट प्रकारचे यीस्ट टाकल्यावर आंबवण्याची अथवा किण्वन प्रक्रिया ( नियंत्रित तापमानात) चालू होऊन द्राक्ष रसातील साखरेचे इथिल अल्कोहोल ( Ethanol ) व कार्बन - डाय- ऑक्साईड ( CO 2 ) मध्ये रुपांतर झाले की आम्ही म्हणतो वाईन तयार झाली.Monday, January 28, 2008

वाईन विषयावरील पुस्तके.

१) " मी द्राक्ष वाईन उद्योग उभारु शकतो का ?

लेखक - डॉ . जयदीप कॄ काळे

पुस्तक मिळण्याचे ठिकान : महाराष्ट्र औद्योगिक महामंडळाचे मुख्य कार्यालय, सर्व जिल्ह्यातील प्रादेशिक कार्यालये अथवा क्षेत्रीय कार्यालये.


२) " वाईन उद्योग " ( प्रकल्प अहवालासहित )

लेखक : - श्री. गोरख पगार

पुस्तक मिळण्याचे ठिकान : नाशिक

Sunday, January 27, 2008

द्राक्ष वाईन हे मद्य आहे कि नाहि ?

दारु म्हणजे असे मद्य की ज्यात ४० ते ४५ टक्के अल्कोहोल आहे. द्राक्ष वाईनच्या बाबतीत हे संभवत नाही. कारण द्राक्षाच्या वाईनमध्ये अल्कोहोल ११ ते १३ टक्के असते आणि वाईन अत्यंत माफ़क प्रमाणातच घेण्याचा प्रघात आहे.. वाईन माफ़क प्रमाणात घेतल्यास माणूस स्वत:ची शुद्ध घालवत नाहि आणि तो व्यसनी सुद्धा बनत नाहि.जर द्राक्ष वाईनच्या सेवनाने माणसे व्यसनाधिन होत असति तर वाईन संस्कृति असलेले देश निकामि बनले असते किंवा वेळीच तेथील सरकारांनी वाईनला प्रतिबंध केला असता .

Saturday, January 26, 2008

वाईनचा दरडोई खप :

फ़्रान्स - ६० लि. दरडोई प्रतिवर्ष
इटली - ५९ लि. दरडोई प्रतिवर्ष
स्पेन - ३७ लि. दरडोई प्रतिवर्ष
युनायटेड किंगडम - २४ लि. दरडोई प्रतिवर्ष
चीन - ३५० मिलि दरडोई प्रतिवर्ष
भारत - ०७ मिलि दरडोई प्रतिवर्ष

वरील महितीवरुन भारतामध्ये वाईनचा खप वाढण्यास प्रचंड वाव आहे हे दिसून येईल.

भारताची भरभराटिस येणारी अर्थव्यवस्था,प्रगतिच्या दिशेने वाटचाल करणारा मध्यमवर्ग आणि जागतिकीकरणाचा प्रचंड वेग पाहता भारतातील वाईन सेवन झपाटयाने वाढत आहे.